उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ रामा कांबळे (३८) यांचे मंगळवारी (दि.४) रात्री ९:४५ च्या सुमारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले,भावजय, दोन पुतणेे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर त्यांच्या मुळगावी काटगाव (ता. तुळजापूर) येथे बुधवारी (दि.५) सकाळी साडेदहाच्या सुमारास वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काटगावच्या सरपंच नगीनाताई कांबळे यांचे ते पती होत.

 
Top