कळंब / प्रतिनिधी- 

तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस अधीक गंभीर होत चालली आहे. या अनुषंगाने

कळंब तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ उपकेंद्रातील एकूण  ६७ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती तात्काळ भरली तर आरोग्य यंञणेवरील ताण कमी होऊन रुग्णांना जलद उपचार होऊ शकतील व रुग्ण बरे होण्याचा दर वाढू शकतो या संदर्भात राज्यमंत्री संजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात डोअर टू डोअर टेस्टींग,ट्रेसिंग व ट्रिटमेंट (टिटिटी) या ञिसुञीवर जास्तीत जास्त भर द्यावा ,पुरेसा औषधसाठा व तत्सम यंञसामुग्री उपलब्ध करावी यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सुचना कराव्यात,होम क्वारंटाईन रुग्णांचा विनाकारण आणी समाजात खुलेआम  फिरण्यासंदर्भात प्रशासनाने अधिक कडक लक्ष घालावे,

जिल्ह्यातील अनेक दवाखान्यात दलालांचा सुळसुळाट असल्यामुळे रुग्णांना नाहक अव्वाच्या सव्वा बिले भरावी लागत आहेत व त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे यासंदर्भात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधितांना आदेश द्यावेत,या व इतर मागण्यांसदर्भात  राज्यमंञी संजय  बनसोडे यांना उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल च्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके यांनी  हे निवेदन वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रदीपजी सोळुंके,जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री जीवनरावजी गोरे,जिल्हाध्यक्ष श्री.सुरेशजी बिराजदार,कळंब तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधरजी भवर यांच्या मार्गदर्शनाखाली  दिले.

 
Top