उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील तेजल व मनीषा यांनी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे ऍडमिट असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना एकवेळचं जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

शासकीय रुग्णालयात ऍडमिट होणारे पेशंट हे आर्थिक परिस्थिती बेताची असलेले व लांब खेडेगावातून आलेले असतात. त्यांच्याबरोबर आलेले नातेवाईक रुग्णालयाबाहेर ताटकळत थांबतात, लॉकडाउनने शहरातील खाणावळीही बंद आहेत म्हणून नातेवाइकांची जेवणाबाबत खूप हेळसांड होते हे बघून त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे. आई अंबिका वाघमारे यांचे कसबे तडवळे येथे चप्पलच दुकान आहे व पतीच्या निधना नंतर त्या तिन्ही मुलींचा सांभाळ करतात.आर्थिक परिस्थिची जाणीव असल्याने त्यांनी हा उपक्रम चालु केला आहे. माया, मनीषा, तेजल अश्या त्यांच्या मुली रोज सकाळी लवकर ऊठुन २०० चपात्या व १० - २० किलोची भाजी बनवतात. एकूण १०० डब्बे पॅक करतात आणि कसबे तडवळे ते उस्मानाबाद ३० किलो मिटीर अतंर स्कुटीवरून पार करून  शासकिय रूग्णालयात त्या स्वतः डब्बे पोहच करतात. आज दहा दिवस झाले हा उपक्रम सुरू आहे.  

 
Top