उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉक्टरांची कमतरता आहे त्यामुळे बीएचएमएस डॉक्टरांना covid-19 मॅनेजमेंट मध्ये सहभागी करून घ्यावे, आणि टास्क फोर्सची स्थापना करा तसेच म्यूकरमायक्रोसिस या आजाराचे रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आढळून येत आहेत त्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी व त्यावरील लागणारे औषधे जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलच्या वतीने देण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश तांबारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, संजय दुधगावकर,उस्मानाबाद विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे,संजय निंबाळकर, प्रदेशाध्यक्षा कू. सक्षणा सलगर, युवक अध्यक्ष आदित्य गोरे,शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे, कादर खान, नंदकुमार गवारे,गटनेते गणेश खोचरे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खलील पठाण, नगरसेवक बाबा मुजावर, खलिफा कुरेशी, अशोक पेठे, इस्माईल काजी, नेते मृत्यूंजय बनसोडे, मनोज मुदगल, अमोल सुरवसे, गौस तांबोळी , रणधीर इंगळे,संस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, विद्यार्थी शहराध्यक्ष,सौरभ देशमुख, ज्ञानेश्वर निंबाळकर,अभिजीत पटकर, लतीफ पटेल, सागर चव्हाण, बापू माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


 
Top