तुळजापूर / प्रतिनिधी -

तालुक्यातील जळकोट येथे कोरोना महामारीत रूग्नाची गैरसोय होऊ नये यासाठी जळकोट ग्रापंचायतच्यावतीने येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन जि.प.सदस्य  प्रकाश चव्हाण  यांच्या हस्ते करण्यात  आले.

जळकोट गावची लोकसंख्या जवळपास पंधरा हजारांच्यावर आहे.तसेच जळकोटला दररोज दहा ते पंधरा गावच्या नागरिकांचा संपर्क आहे. सदरील सेंटर चालु करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोक पाटील यांनी पाठपुरवठा केला होता.

यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले, गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास पवार, बसवराज कवठे,महेश कदम, कृष्णात मोरे, ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, अंकुश लोखंडे,‌ जीवन कुंभार,कल्यानी साखरे ,पिन्टु कागे,राजु पाटील, बबन मोरे,नारायण पटणे, नरसिंग हिडोळे, नितीन माळी, महादेव सावंत, अर्जुन कदम, विजय यादगौडा, सुनील माने, जितु पाटील, विठु कदम,प्रवीण पाटील,डॉ विष्णू सातपुते,उप अभियंता ए.आर.खान, विस्तार अधिकारी सर्जे, ग्रामविकास अधिकारी जे.के.पारे उपस्थित होते.

 
Top