तुळजापूर / प्रतिनिधी - 

तालुक्यातील आपसिंगा येथील पतीचा निधनानंतर पत्नीचे दीड महिन्यानंतर निधन झाल्याची घटना बुधवार दि. १९ रोजी घडली  सदरील मुस्लीम  महिला निराधार असल्याने तिच्यावर ग्रामपंचायतने कोरोना निर्देशाचे पालन करीत मुस्लीम पध्दतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, आपसिंगा (ता. तुळजापूर) येथील शमशाद मुबारक यांच्या पतीचे दीड महिन्या पुर्वी निधन झाले होते . नंतर बहिणीने शमशादला आपल्या गावी मार्डी जिल्हा सोलापूर येथे नेले.बुधवार दि १९ रोजी शमशाद निधन झाल्यानंतर तिस तिच्या बहीणीने आपसिंगा येथे आणले असता ग्रामपंचायतने बहीणीची तपासणी केली असता ती पाँजीटीव्ह निघताच तिच्या सोबत आलेली मंडळी तिला दवाखान्यात नेतो म्हणून निघुन गेल्यावर ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी चैतन्य गोरे यांनी शमशाद वर कोरोना निर्दशाचे पालन करीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेवुन मृतदेहावर औषध फवारणी करुन पँक केले नंतर ग्रामपंचायत सदस्य अमीर शेख, मलिक राजगुरु,  धनंजय क्षिरसागर, चाँदफकीर यांनी मुस्लीम धर्माप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार विधी केला.

 
Top