तुळजापूर / प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे अंत्योदय व प्राधान्य योजनेतील सर्व राशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकान क्र. 1 आणि 2 मधून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति माणसी 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ अन् 1 किलो हरभरा अशा धान्यांचे आज (दि. 19) गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत वाटप करण्यात आले. 

या वाटप कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच दत्तात्रय वडणे, जेष्ठ पत्रकार अविनाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते हणमंत गवळी, स्वस्त धान्य दुकानदार श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब जगताप, ग्रामसेवक डी. एल. रेड्डी,  ग्रा. पं. सदस्य सुधीर पाटील, हमीद पठाण, अप्पा रणसुरे, सतीश माळी, संभाजी माळी, सोसायटीचे माजी चेअरमन शिवदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगताप, शाहीर गायकवाड, गोपाळ गायकवाड, रामदास गडगडे, राम शिंदे, मुनीर गाडीवान, बलभीम माळी आदींची उपस्थिती होती.

 
Top