पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा
लॉकडाऊन, तपासणी, कोरोना उपचार, व्यवस्था आदी बाबींसंदर्भात जाणून घेतली माहिती

उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यांनी कोरोना उपचार, तपासणी, व्यवस्था या संदर्भात माहिती जाणून घेऊन विविध विषयाच्या अनुषंगाने सूचना केल्या. राज्यातील सतरा जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी एकदाच संवाद साधला.

जिल्ह्याच्या परीस्तिथीचा आढावा घेत संवाद साधत सूचना दिल्या. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणवर भर देण्यात यावा, अश्या सूचना केल्या असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. या विडिओ कॉन्फरन्सला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. 

कोरोना साथ निर्मूलन करण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणीत रुग्ण पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्के पॆक्षा कमी असायला हवा त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या तर कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट टेस्टिंग व त्यांची तपासणी व जास्तीत जास्त लसीकरणवर भर द्या, असे मोदी म्हणाले. मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करा, कोमोरबिड लोकांची शोध मोहीम व त्यांचे प्राधान्याने लसीकरण करा तसेच पुढील काळात अधिक सुसज्ज सतर्क रहा अश्या सूचना मोदी यांनी दिल्याची महिती दिवेगावकर यांनी दिली.

कोरोना निघून गेला अस समजू नये.पॉझिटिव्ह रेट कमी जास्त होतो आहे. त्याचा विचार करावा व त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. सर्व अडचणींवर मात करावी लागणार आहे. तिसऱ्या लाट संदर्भात सर्वांनी काळजी घ्यावी, त्यात लहान मुलाना धोका आहे. म्युकरमायकोसिसच प्रमाण वाढत आहे त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन काम करा. देशपातळीवर लॉकडाउन बाबत विचार झाला नाही. स्थानिक पातळीवर विचार करावा अश्या सूचना मोदी यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यचा पॉझिटिव्हीटी रेट हा 33 टक्क्यावरून 18 टक्के इतका आलं आहे तर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून त्यात 59 हजार कोमोरबिड रुग्ण सापडले आहेत. त्याच्या लसीकरणला प्राधान्य दिले जात असून त्यापैकी 24 हजार रुग्णाचे लसीकरण पूर्ण केले आहे अशी माहिती दिवेगावकर यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसऱ्या लाटेतील मृत्युदर कमी ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले असून 152 गावात 10 पेक्षा कमी रुग्ण आहेत तर 93 गावात सापडलेले सर्व रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना मुक्त गाव ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण संख्या कमी झाली म्हणजे टेस्टिंग कमी करा असे नसून जास्तीत जास्त तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी लागणाऱ्या किटचा पुरेसा साठा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर देण्यात आल्याची जिल्हाधिकारी यांनी महिती दिली.

 
Top