उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना काळात दारु विक्री बंद असताना बनावट िवदेशी दारु तयार करण्यासाठीचे साहित्य व विदेशी दारूच्या बाटल्या असा सात लाख ९२ हजार ३६६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी केली.

सोनारी येथील शैलेश भाऊसाहेब हांगे परराज्यात निर्मीत व राज्यात विक्रीस मनाई असलेली बनावट विदेशी व देशी दारुची चोरटी आयात व विक्री करणार असल्याचे बातमी मिळाली. त्यानुसार उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक बी. टी. ढोकरे, एस. पी. काळे, एस के शेटे, सहाय्यक दुय्यक निरीक्षक एस. आर. शिंदे, एम. एस. गजधने, एल. ए. डोंबाळे, एम. पी. कंकाळ, आर. आर. गिरी, व्ही. आय. चव्हाण, ए. बी. बोंगाणे वाहनचालक ए. एम. सोनकांबळे, ए. आर. शेख यांनी हांगे याच्या घरी झडती घेतली. १५ लिटर क्षमतेचे एकूण ३ प्लॉस्टीक कॅनमध्ये विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे बनावट ब्लेन्ड, १००० मिली क्षमतेच्या एकूण १०७ प्लॉस्टीक बाटल्या, विदेशी मद्य रॉयल स्टॅगच्या १८० मिली क्षमतेच्या एकुण ४८ बाटल्या, विदेशी मद्य इंपिरीअल ब्लुच्या १८० मिली क्षमतेच्या एकुण ४८० बाटल्या, मॅकडॉल नं १ व्हीस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ४८०, अशा एकूण ५३७६ बाटल्या जप्त करण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली.


 
Top