तुळजापूर / प्रतिनिधी

 तालुक्यातील गुळहाळी येथील शेतकरी संघर्ष समिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक652चे आध्यक्ष व मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मावेजा मिळावा यासाठीचे याचिकाकर्त्ये पाडुरंग सखाराम निकम (६६) यांचे बुधवार दि.१९ रोजी  राञी ८.३० वा. सोलापूर येथील आश्विनी रुग्णालयात उपचार  चालु असताना निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,दोन मुली, चार भाऊ  असा परिवार आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहोरात्र झगडणाऱ्या योद्धाच्या संघर्षमय पर्वाचा अंत झाला.अशी प्रतिक्रिया शेतकरी  वर्गातुन निधनानंतर व्यक्त  होत  आहेत. गुरुवार दि 20 रोजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top