लोहारा/प्रतिनिधी

कोरोना रुग्ण वाढत आहेत, यावर उपाय करण्यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेने लोहारा शहरातील संपुर्ण रस्ते, गल्ली व घरे फवारण्यास शिवसेनेच्या माध्यमातुन शहरात जंतुनाशक फवारणीस प्रारंभ करण्यात आला आहे. 

या अनुशंगाने प्रथम नगराध्यक्षा तथा नगरसेविका पौर्णिमा जगदीश लांडगे यांच्यावतीने प्रभाग क्र 4 मध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, माजी नगरसेवक शाम नारायणकर, जगदीश लांडगे, खय्यूम कुरेशी, मुनीर कुरेशी, सद्दाम बागवान, प्रेम लांडगे, ओम रेनके, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. व तसेच शिवसेना युवानेते किरण गायकवाड यांनी लोहारा शहर फवारणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारणीचे औषध उपलब्द करुण दिले. त्यामुळे लोहारावासियातुन त्यांचे कौतुक केले जात आहे. 

 
Top