उस्मानाबाद येथील १०० विद्यार्थी क्षमतेच्या ४३० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास १३ जानेवारी २०२१ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारीची अटही रद्द करण्यात आली होती. त्यानुसार ४४८ पदे निर्मिती करण्यास व भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या रुपये ९६.७० कोटी अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली असून या कार्यवाहिला उच्च स्तरीय सचिव समितीच्या मान्यतेची आवश्यकता नाही असा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेल्या ४४८ पदामध्ये गट-अ एक अधिष्ठाता, २० प्राध्यापक, २६ सहयोजी प्राध्यापक, एक मुख्य शासकीय अधिकारी अशा ४८ पदांचा समावेश आहे. गट-ब मध्ये ४३ सहाय्यक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा ४४ पदांचा समावेश आहे. गट-क मध्ये एक ग्रंथपाल, दोन कार्यालयीन अधीक्षक, ३ लघुलेखक, ५ वैद्यकीय समाजसेवक, १५ वरिष्ठ सहायक, एक रोखपाल, १२ प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, २ सहायक ग्रंथपाल, ९ वरिष्ठ लिपिक, २५ कनिष्ठ लिपिक, १०क्ष किरण तंत्रज्ञ, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण ९३ पदांचा समावेश असून, बाह्यस्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -३ ची एकूण १३९ तर वर्ग -४ ची एकूण ६५ पदे मंजूर करण्यात आली आहेत. विद्यार्थी पदे एकूण १०० असून, त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील.
उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी सादर केल्यानुसार उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे होता त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करून त्यास शासनाची मंजुरी प्राप्त करून घेण्यात यश मिळाले आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शन मा.केंदीय कृषीमंत्री, राज्याचे मा.मुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , पर्यावरण व राज शिष्ठाचार मंत्री आदित्यजी ठाकरे , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैय्या देशमुख , सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे , मा.मंत्री तथा शिवसेना उपनेते प्रा.डॉ.आमदार तानाजीराव सावंत , मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख-पाटील , वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर तसेच महाविकास आघाडी सरकार मधील सर्व मंत्री महोदयांचे उस्मानाबाद जिल्हावासियांच्या वतीने आभार मानले.