तेर / प्रतिनिधी- 

खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेल्यानंतर दवाखान्याच्या बाहेर आल्यावर एका 65 वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.ही घटना 3 मे ला तेर येथे घडली.त्या रुग्णाकडे बराच वेळ कुणीही लक्ष न  दिल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बसस्थानकाजवळ खाजगी  रुग्णालयात 3 मे ला बाराच्या सुमारास  किनी ता. उस्मानाबाद येथील एक 65 वर्षीय नागरिक उपचारासाठी आला.तपासणीनंतर दवाखान्याच्या बाहेर आल्यावर जागेवरच पडुन त्या व्यक्तीचा मृत्यु झाला. त्यामुळे उपस्थित नागरिक प्रचंड भयभीत झाले. त्यानंतर हा कोरूना पॉझिटिव मृत्यू नागरिक गावाकडे कसा आणायचा याबाबत सुसंवाद न झाल्यामुळे कोरोना रुग्णाचा मृतदेह बराच वेळ  खाजगी रुग्णालयाच्या समोर तसाच पडून होता.यानंतर सदर कोरोना मृत व्यक्तीची एॅटीजन टेस्ट तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.ब-याच वेळेने कोरोना मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या जवळील एक नागरिक यांनी किट घालून तेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत किनी येथे कोरोना मृत्यू पावलेल्या व्यक्तीला नेण्यात आले.परंतु किणी ता. उस्मानाबाद येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेला व्यक्ती खाजगी दवाखान्याच्या समोर मृत्यू पावलेला असतानाही त्याची गंभीर दखल संबंधितांनी न घेतल्यामुळे बराच वेळ तो मृतदेह खाजगी दवाखान्याच्या समोरच पडून होता. त्यामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले होते. शासन या गंभीर बाबीकडे का लक्ष देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 
Top