तेर / प्रतिनिधी- 

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही व लाॅकडाऊनही असताना उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दारुडे दारू पिऊन मुक्त संचार करत असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढतच जात असून कोरोना रोगामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. परंतु तेर येथे विविध ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे.लाॅकडाऊन  असतानाही दारुडे बिनधास्तपणे या ठिकाणी दारू पिऊन  तेर मध्ये मुक्त संचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस विभागाने पोलीसी हीसका दाखवून दारू पिऊन  तेर मध्ये मुक्त संचार करणाऱ्या दारुड्यांना पोलिस विभागाचा  हिसका दाखवण्याची आवश्यकता आहे.

 
Top