तेर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील छगण मेसबा सोनटक्के या कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू तेर येथील संजीवनी क्लिनीक च्या दरवाज्यात कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती .यावेळी सोनटक्के यांची केलेल्या कोरोनाच्या टेस्टमध्ये सोनटक्के हे पाॅझिटीव्ह आढळून आल्यानंतर तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता.  त्याबद्दल विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षिका डॉ नागनंदा मगरे व संजीवनी क्लिनीकचे डॉ श्रीकांत लोमटे यांना चौवीस तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

 दिनांक ३ मे २०२१ रोजी उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील ६५ वर्षीय छगन मेसबा सोनटक्के या इसमाचा तेर येथील खासगी दवाखान्या समोर मृत्यू झाला होता त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मृत रुग्णांच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावण्यास उभयतांनी टाळाटाळ केली म्हणून आपणा विरुद्ध नर्सिंग अॅक्ट १९४७ अधिनियम महाराष्ट्र कोविंड १९ उपाययोजना २०२० मधील ११ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे नियम ५१ ते ६० भारतीय दंड संहिता ४५ आॅफ १८६० मधील कलम १८८ व इतर कायदेशीर व तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई का करु नये याबाबतचा खुलासा चौवीस तासांच्या आत सादर करावा असा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आदेशाच्या प्रति तहसीलदार उस्मानाबाद यांच्या मार्फत तातडीने बजावण्यात आल्या आहेत.

 
Top