तेर  / प्रतिनिधी- 

कोरणा रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तेर ग्रामपंचायतीने तेर येथे आज 6 मे पासून १2 मे पर्यंत जनता कर्फु जाहीर केला आहे. तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतमध्ये बैठक होऊन 6 मे ते 12 मे पर्यंत तेर येथे जनता कर्फु लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यावेळी उपसरपंच मज्जित मणियार, तलाठी श्रीधर माळी ,प्रभारी ग्रामविकास अधिकारी पवार ,तेर दूरक्षेत्राचे बीट अंमलदार  मुरळीकर उपस्थित होते.

 
Top