दोषींवर कडक करवाई करण्याची जिलाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचे  खुन होत असून महिलांवर अत्याचार होत आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत पिडीतांच्या कुटुंबीयांना मदत व दोषी विरुध्द कडक करण्याबाबत जिल्ह्यात विविध ठिकणी निदर्शने करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरसत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरूकेला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. महिलांवरअन्याय अत्याचार करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा सर्व स्तरातून निषेधकरण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरत्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवरतृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्याठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.  या घटनांच्या निषेधार्थभारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज़िल्हात आज  निदर्शने करण्यातआली.  पश्चिम बंगालमध्ये होत असलेला हिंसाचार थांबविण्यातयावा,  या हिंसाचारामध्ये बळी गेलेल्याकार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी  या घटनेला जबाबदारअसणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची  मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच पिडीत कुटुंबीयांना न्याय न मिळाल्यास पुढील काळात भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या कुटुंबियांना लवकर न्याय नमिळाल्यास पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलने करण्यातयेतील. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅङ नितीन भोसले, राजसिंहा राजेनिंबाळकर, प्रविण पाठक, राहुल काकडे सुजित साळुंके इत्यादी कार्यकर्ते  उपस्थित होते.

 
Top