तुळजापूर / प्रतिनिधी -
महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व जनतेमध्ये तणावाचे वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये श्री श्री रविशंकर गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातून “महाराष्ट्र मेडीटेट”नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये दिनांक 21 ते 31 मे दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने मोफत प्राणायाम व ध्यान शिबिरे आयोजित केली आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 900 ते1000 लोक या शिबिराचा लाभ घेत आहेत. जिल्ह्यामध्ये दररोज प्रत्येक एक तासाला या शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे. अशी माहिती आर्ट ऑफ लिविंग जिल्हा समिती यांच्याकडून देण्यात आली.