तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूर तालुक्यातील सर्व दिव्यांगाना घरपोच लस देण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती जनआंदोलन  संघटनेने तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, दिव्यांग बांधवांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत असते या पार्श्वभूमीवर त्यांना प्राधान्य क्रमानै मोफत घरपोच लस देण्याची मागणी केली आहे. हे निवेदन कमलाकर डिग्गे ,  शशीकांत मुळे, ज्ञानेश्वर मडके, गजेंद्र व्यवहारे, हिना खाने सय्यद यांनी दिले


 
Top