दादासाहेब जानराव प्रतिष्ठान उपळाई रोड बार्शी व मित्र परिवाराचा उपक्रम


परंडा/ प्रतिनिधी- 

 संपूर्ण भारत देश व महाराष्ट्रात कोविड-१९ च्या संसर्गाने थैमान घातले असून कोविड बाधित रुग्णांना ,ऑक्सिजन , रेमसीडविर इंजेक्शन व औषधाचा तुटवडा जानवत असून अनेक. रुण दगावत आहेत हे पाहून डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती व १ मे कामगार दिनाचे औचित्य साधून बार्शीचे सुपुत्र सुनिल जानराव व सागर जानराव यांचे मार्गदर्शनाखाली दादासाहेब जानराव प्रतिष्ठान उपळाई रोड बार्शी व मित्र परिवारातर्फ बार्शी येथील शासकिय रुग्णालयात ऑक्सिजनच्या १४ जंम्बो टाक्याचे वाटप केले.

   तसेच परंडा तालूक्याची परस्थिती पाहून औषधी गोळयांचे किट संत मिरा इंग्लिश स्कूल येथील कोविड सेंटरला वाटप करून सामाजिक बांधिलकिचे काम केले आहे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादासाहेब जानराव , कार्यकर्ते व कोविड. सेंटरवरील कर्मचारी हजर होते.


 
Top