टाकळी बेंबळी येथे गोळीबार;
जमिनीवर फायर केल्याने छर्रे उडून दोन जखमी


उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी  बेंबळी येथे  दुचाकीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने दुसऱ्या व्यक्तीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचा नेम चुकून फरशीवर लागल्याने उडून अन्य दोघे जखमी झाले. दरम्यान घटनास्थळावरून गोळी जोडणारा पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी बेंबळी पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. ही घटना शनिवारी दि. १ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

दिपक धनाजी जगताप (रा. पुणे) हा लाँकडाऊनमध्ये त्याच्या  तीन मित्रासोबत टाकळी येथे आला होता. टाकळी येथील अनिल सूर्यवंशीकडून त्याने पाच वर्षांपूर्वी  दुचाकी  विकत घेतली होती. सदर दुचाकीचे पैसे  सूर्यवंशी  मागत होता.त्याचा राग मनात धरून पाच  वाजण्याच्या सुमारास समाज मंदिर टाकळी  येथे दिपक धनाजी जगताप याने त्याच्याकडील  पिस्तूलमधून एक गोळी झाडली. अनिल राम सूर्यवंशी आणि  दीपक जगताप हे  एकमेकांच्या  ओळखीचे आहेत. दीपक जगताप याने अनिल सूर्यवंशी याची पाच वर्षांपूर्वी दुचाकी विकली होती, त्या पैश्याच्या वादातून दोघात गावातील समाज मंदिरात जोरदार भांडण झाले.  येथे सूर्यवंशी व अन्य दोन लोक बसले होते.  दिपक धनाजी जगताप हा तेथे पिस्तूल घेऊन आला. त्याने जमिनीवर गोळी झाडली. त्याचे छर्रे उडून ते सूर्यवंशी यांच्यासोबतच्या दोन लोकांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना  उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. यानंतर चौघेही दोन दुचाकीवरून उस्मानाबादच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी पोलिस ठाण्याचे पथक तपास करण्यासाठी तत्काळ दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यादी तपासाची चक्रे गतीने फिरवत पंचनामा केला. तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. चौघांना पकडण्यासाठी बेंबळी पोलीस ठाण्याचे एक पथक व पोलिस नियंत्रण पक्षातील अन्य एक पथक मागावर गेल्याचे समजते.


 
Top