उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बु. येथील रहिवासी व तुळजापूर तालुका क्रीडा शिक्षक महासंघाचे सदस्य, तुळजापूर तालुका खाजगी शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेचे माजी सचिव, तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक चंद्रकांत दिगंबर कांबळे (वय- ४७ वर्ष) यांचे कोरोनामुळे दि.२५ मे रोजी निधन झाले. 

त्यांना कोरोना विषाणूंची लागण झाल्यामुळे प्रथम तुळजापूर येथे व त्यानंतर सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. ते खिलाडूवृत्तीचे उत्तम क्रीडा शिक्षक होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 
Top