तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरुळ येथील कंचेश्वर शुगर प्रा. लि. साखर कारखान्यात जिल्हयातील एकमेव्य  इथेनाँल निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असुन जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा  मानस असल्याची माहीती कंचेश्वर शुगर प्रा. लि. चे चेअरमन धनंजय भोसले यांनी दिली.

या इथेनाँल प्रकल्पाबाबतीत माहीती देताना धनंजय भोसले म्हणाले की, या प्रकल्पामुळे उस उत्पादक शेतक-यास प्रतिटन शंभर ते दीडशे रुपये अधिक दर  देणे शक्य होणार आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे कृषी मंञालयाने देशातील १८५ सक्षम साखर कारखान्याकडुन केंद्र सरकारने अर्ज मागवले व त्यातुन महाराष्ट्र राज्यातील ११ साखर कारखान्यास इथेनाँल प्रकल्प उभारुन इथेनाँल निर्मितीस परवानगी दिली. त्यात जिल्यातील मंगरुळ येथील एकमेव्य कंचेश्वर कारखान्यास परवानगी मिळाली.यावेळी केंद्र सरकारने येथील उत्पादीत इथेनाँल खरेदीसाठी आँईल मेकींग कंपनीशी येथील उत्पादीत इथेनालचा खरेदी करार केला. हा प्रकल्प प्रदूषणमुक्त असुन यासाठी २८ कोटी रुपये खर्च येत आहे. या प्रकल्पास ४५ केएलपीडी इथेनाँल निर्मितीस मंजुरी दिली. ३ लाख लिटर इथेनाँल साठ्याचे येथे नियोजन आहे. इथेनाँल वितरण थांबले तर कच्चा माल तयार करण्याची सुविधा येथे आहे.

या प्रकल्पासाठी साखर कारखान्यातील घाण पाणी रिक्लिनिंग करुन वापरले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्णता प्रदुषणमुक्त असणार असुन यावर केंद्र सरकारच्या प्रदूषण मंडळाचे लक्ष असुन त्यांच्या  देखरेखखाली पुर्णत्वास जात आहे. रोज दीडशे कामगार हा प्रकल्प उभारत आहेत. येथेही स्थानिक बेरोजगारांचा हाताला काम मिळत आहे. सदर प्रकल्पास युनियन बँक आँफ इंडिया ने केंद्र सरकारच्या शिफारशी नुसार कर्जरुपात अर्थसहाय्य केले आहे. सदर प्रकल्प काम ९० टक्के पुर्ण झाले  आहे.जुलै 2021 च्या पहिल्या आठड्यात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस चेअरमन धनंजय भोसले यांनी व्यक्त केला.यावेळी अधिकारी प्रशासकीय  संजय जाधव मँनेजर संजय   गारुडकर उपस्थितीत होते.

 
Top