परंडा / प्रतिनिधी - 

 परंडा तालुक्यातील सोनारी येथील कोविड उपचार केंद्रात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. रविकिरण लोखंडे यांनी सोनारी येथील कोविड केंद्रात प्रवेश करत कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारी न घेता आतील रुग्णांची तपासणी केली. अशा प्रकारे त्यांनी निष्काळजीपणाचे कृती करुन संक्रमणाची शक्यता निर्माण केली. यावरुन अनाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी अमृता भांडवलकर यांच्या फिर्यादीवरुन आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Top