तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा तात्काळ मंजूर करा, अन्यथा अग्र आंदोलन करू अशा इशाराच  देवराज मिञमंडळाने जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देवून दिला आहे.

 निवेदनात म्हटलं आहे की,  सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाली आह.े महसुल पिक कापणी अहवाल व आणेवारी सुध्दा पन्नास टक्के आत आहे,त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील शेतकरी पिकविम्यास पाञ आहेत. परंतु कंपनीने पिकविमा अद्यापर्यंत दिला नाही कंपनीच्या जाचक अटी शर्ती मुळे शेतकऱ्यांनवर अन्याय होत आहे,तरी शेतकऱ्यांना पिकविमा देवुन त्यांना न्याय द्यावा, अन्यथा देवराज मिञमंडळ तर्फ उग्र आंदोलन करेल, असा इशारावजा  निवेदन अँड उदय भोसले यांनी कृषी अधिकारी व पिकविमा प्रतिनिधी यांना दिले आहे. 

 
Top