जिल्ह्यात कोरोना नियमात शिथिलता देत दुकानांची वेळ अकरा ऐवजी वाढवून दोन वाजेपर्यंत करण्याची तसेच सर्व दुकाने उघडण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. या अंतर्गत कडक निर्बंध लादण्यात आले असून किराणा, भाजी आदी अत्यावश्यक सेवा केवळ ७ ते ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात आली आहेत. परंतु, यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने सर्वच दुकाने ११ ऐवजी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देऊन व्यापारी, नागरिक, कामगारांना दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याचा फायदा होऊ शकतो. मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष अॅड. धीरज जाधव व तालुका अध्यक्ष विजय भोसले यांची उपस्थिती होती.