तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव  कुलदीप पवार (३८) यांचे कोरोनाने मंगळवार दि १८ रोजी सकाळी ६.३०वा उपजिल्हारुग्णालयात उपचार  चालु असताना  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई असा परिवार आहे.

कै. कुलदीप पवार हे प्रथमता खाजगी  रुग्णालयात उपचार घेवुन बरे झाले होते नंतर ते उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.  अचानक  त्यांची आँक्सीजन पातळी खालवल्याने मरण पावल्याचे समजते.

 कै. कुलदीप पवार हे गेली दहा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सहसचिव पदावर कार्यरत होते.त्यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे आईने कष्ट करुन त्यांच्या सांभाळ केला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ते माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सदैव  मदतीसाठी पुढे असत त्यांच्या निधनाने शेतकरी वर्गात तसेच शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


 
Top