तुळजापूर / प्रतिनिधी- 

तालुक्यात ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना पाँजीटीव्ह  रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असुन मुत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.या पार्श्वभूमीवर  तालुका आरोग्य विभाग अँक्शन मोडवर आला असुन तालुक्यातील  तिर्थब्रुद्रक येथे ७५ ग्रामस्थांची तपासणी केली असता यात  १५ ग्रामस्थ पाँजीटीव्ह निघाले आहेत.

या गावातील एका लोकप्रतिनिधी मुत्यु होताच कोरोना तपासणी सुरु केली असुन हजार बाराशे  लोकसंखेच्या गावातील ७५ लोकांची तपासणी झाली असता १५ ग्रामस्थ  पाँजीटीव्ह निघाल्याने आरोग्य विभागाने  या गावावर अधिक लक्ष केंद्रित केले असुन डीएचओ  डाँ हणमंतराव वडगावे यांनी तिर्थब्रुद्रक ला भेट देवुन  आरोग्य तपासणी केंद्रात  जावुन पाहणी करुन आढावा घेतला .

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.सुहास पवार हे होते.उर्वरीत ग्रामस्थांचा टेस्ट वैद्यकीय अधिकारी डा़ँ.जाधव  मँडम करीत आहेत .तिर्थब्रुद्रक येथे ७५ लोकांची तपासणी केली असता १० पाँजीटीव्ह निघाले तर तुळजापूर येथील कोविड सेंटर मध्ये तिर्थब्रुद्रक  येथील काही ग्रामस्थांची  तपासणी केली असता त्यात पाच पाँजीटीव्ह निघाले.

 
Top