तेर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोरणा विलगीकरण केंद्रास जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज भेट दिली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, तहसीलदार गणेश माळी, मंडल अधिकारी अनिल तीर्थकर, तेरचे तलाठी श्रीधर माळी यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण केंद्राबाबत समाधान व्यक्त केले.तसेच कोरोना विलिनीकरण केंद्रात मोफत सेवा देणारे डॉ.के.बी.बाहेती, डॉ.तानाजी काटे, डॉ.बालाजी खराडे, डॉ.सुनिल शेंडगे, डॉ.श्रीकांत लोमटे, डॉ.मयूर मुळे यांचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच डिस्चार्ज मिळालेल्या रूग्नाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते झाड व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दत्तात्रय मुळे ,सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जित मणियार , गोरोबा पाडुळे,विठ्ठल लामतुरे ,तानाजी पिंपळे, नवनाथ पांचाळ,समिर बनसोडे, नरहरी बडवे,गोरख माळी, हरी खोटे,जुनेद मोमीन,भास्कर माळी, प्रभाकर शिंपले,अविनाश खांडेकर, अशपाक शेख, बालाजी पांढरे, श्रीमंत तेरकर,रविराज चौगुले,अमोल थोडसरे, पांडुरंग भक्ते, सुरेश माने,छोटुमि‌या कोरबु,एस.एस.बळवंतराव, ग्रामविकास अधिकारी  पवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी ग्रामीण रुग्णालयासही भेट देऊन पाहणी केली.


 
Top