परंडा / प्रतिनिधी -

सन-२०१९-०२० च्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी जाहीर करून ती प्रसिद्ध करावी या विषयाचे अनुषंगाने प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांना माहितीस्तव व्हाट्सप केली आहे.  

तसेच शिक्षणाधिकारी(प्रा.) डॉ.अरविंद मोहरे यांना व्हाट्सप च्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे.सन-२०१९-०२० च्या जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी आजतागायत जाहीर केलेली नाही.प्रहार शिक्षक संघटनेने यापुर्वीच दि.२२ मार्च २०२१ रोजी प्रत्यक्ष निवेदन दिले होते, तसेच शिक्षण समितीच्या बैठकीत जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्याचे अनुषंगाने विषय मांडावा याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा.) यांना ४ एप्रिल२०२१ रोजी व्हाट्सप मेसेज केला होता परंतु जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी जाहीर करण्याचे अनुषंगाने उचित कार्यवाही होताना दिसेना.कोविड-१९ च्या प्रादुर्भावाचे कारण पुढे करत गतवर्षी पासून हा विषय फाईल मध्ये बंद आहे.

ज्या-त्या वेळी जो-तो विषय मार्गी लावल्याने किंवा निकाली काढल्याने योग्य त्या शिक्षकांना न्याय मिळेल अशी संघटनेची धारणा आहे, कालावधी वाढत गेल्याने किंवा विलंब लावल्याने मानवी हस्तक्षेपास वाव मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे एखाद्या शिक्षकावर अन्याय होऊ शकतो ही बाब लक्षात घेता पुरस्कार वितरण सोहळा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेवर घेतला तरी चालेल पण लवकरात लवकर जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड यादी जाहीर करून प्रसिद्ध करावी.

सदरिल निवेदनावर प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक दत्तात्रय पुरी, जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा समन्वयक फिरोज शेख, सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गोरे, धम्मदीप सवई, महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे मॅडम आदि.पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top