उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पु.वि.लोकराज्यचे  व अन्य दैनिकांचे ही काम करणारे  शिराढोण येथील पत्रकार तसेच कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून शासनाची अनेक पुरस्कार मिळवणारे राजेंद्र मथुरादासजी मुंदडा (50) यांचे  शनिवार दि. ८ मे २०२१ रोजी सकाळी लातुर येथे दुःखद निधन झाले .दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोणाची लागण झाल्यामुळे त्यांना लातूर येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . दोन-तीन दिवसापासून त्यांची प्रकृती सुधारली होती .पण आज सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मागे 2भाऊ, 7 बहिणी, पत्नी, मुलगा, विवाहीत मुलगी, पुतणे, नातु असा परिवार आहे. त्यांचावर शिराढोण येथे मुंदडा मळ्यात दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार  करण्यात आले . मुंदडा यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. पु.वि.लोकराज्यच्या माध्यमातुन त्यानी विकासात्मक प्रश्न  मांडले होते. लोकराज्य परिवाराच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली


 
Top