उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन लसी दिल्या जातात पैकी कोवीशील्ड ही बहुतांश लोकांना दिली गेलेली आहे तसेच कोवेक्सिन चा पहिला डोस उस्मानाबाद जिल्ह्यात हजारो ज्येष्ठ व्यक्तींना तसेच प्रशासनात कार्यरत असणाऱ्या शेकडो लोकांना को वॅक्सीन या लसीचा पहिला डोस देण्यात आला होता त्याला आज जवळपास एक महिना ते दीड महिना कालावधी होत आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने किमान दुसरा डोस ज्यांचा राहिला आहे त्यांच्या पुरती का होईना को-वॅक्सीन ही लस उपलब्ध करून तात्काळ दिली पाहिजे,अशी मांगणी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केली आहे. 

मागील 28 तारखे पासून जिल्ह्यामध्ये को वेक्सिन ही लस उपलब्धच नाही तब्बल नऊ दहा दिवसात ज्यांचा दुसरा डोस आला आहे अशा हजारो ज्येष्ठांनी लसीकरणाच्या ठिकाणी जाऊन याची चौकशी केली आहे परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली आहे

प्रशासनाने किमान दुसरा डोस ज्यांचा राहिला आहे त्यांच्या पुरती का होईना को वॅक्सीन ही लस उपलब्ध करून तात्काळ दिली पाहिजे. अनेकांनी सिव्हील हॉस्पिटल, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लशीच्या उपलब्ध ते विषयी अनिश्चितता दर्शवली आहे.

एकीकडे शासन लस घेण्याविषयी जागरूकता करत आहे व दुसरीकडे हजारो लोकांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जात नाही तसेच पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा डोस ठराविक मुदतीत घेणे गरजेचे आहे असे वैद्यकीय निर्देश आहेत असे असताना सुद्धा प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे यामुळे हजारोंचा जीव टांगणीला लागलेला आहे नागरिकांमध्ये संभ्रम व गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी को वॅक्सीनं  लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी केली आहे.

 
Top