शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेवक सुनिल रोचकरी यांनी स्वखर्चाने फ्लेवर ब्लाँक बसवुन देण्याचा कामाचा शुभारंभ बुधवार दि.२७ रोजी करण्यात आला.
दरम्यान बाळासाहेब साळुंके यांच्या घरासमोरील बोळ, सोमाजी, नाईकवाडी, झाडपिडे, राऊत बोळ,व्यास वाडा,खुरूद लसणे बोळ,दिनोबा बोळ,हिराळकर बोळ,चाटूफळे बोळ येथे नगरसेवक सुनिल पिंटू रोचकरी यांच्या स्वखर्चाने फ्लेवर ब्लाॅक चे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील,सज्जनराव साळुंके,शिवाजीराव जाधव,ऋषीकेश मगर,आनंद जगताप,लखन पेंदे मुन्ना साळुंके,शेंबेकर काका,निकते काका,निलेश व्यास,अशोक घाडगे,धनंजय कुलकर्णी,शेषाद्री घाडगे यांच्या हस्ते करण्यात आल.
यावेळी सुहास गायकवाड, करण साळुंके, अक्षय सुरवसे, अभिजित कुतवळ, राहुल भालेकर,चंदू जाधव, शिवाजी अमृतराव,विशाल रोचकरी,ननू लसणे उपस्थित होते.
