उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उस्मानाबाद येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना वारियर्स व कोरोना  योद्धे यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना योध्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी घालून दिलेल्या आदर्श नुसार भारतीय जनता पार्टीच्यावतीने आम्ही कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत असून कोरोना काळात आरोग्य सेवा करून अनेकांचे प्राण वाचवल्याच्या निमित्ताने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत आहोत असे  आ.  पाटील यांनी सांगितले.

कोरोना काळात कोरोना  बाधित नागरिकांची रात्रंदिवस सेवा करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, निवासी शल्य चिकित्सक डॉ. सचिन देशमुख, सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालय सांभाळणारे डॉ. इस्माईल मुल्ला त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स, कर्मचारी तसेच रुग्णालय परिसरातील नातेवाईकांना जेवणाचे डब्बे पुरवणारे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ॲम्बुलन्स चालक,  पोलिस कर्मचारी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन प्लांट नियमित सुरू ठेवण्यासाठी अहोरात्र काम करणारे कर्मचारी व कोरोना वार्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर ,स्वातंत्र्य सैनिक कॉलनी,बालाजी नगर ,शेकापूर रोड येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगा मुधोळकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी हलसे, पोहेकॉ एस.आर. आरदवाड, महावितरण कर्मचारी गुणवंत कासपटे, आरोग्य सेविका सुजिता दारफळकर, सुनीता लकडे, आरोग्य सेवक संजय जाधव, आरोग्य सहाय्यक प्रमोद बोंदर, आशा कार्यकर्ती कोमल ढवण, मंगल मोरे, आशा पिसे, अंजली चराटे या कोरोना योध्यानचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे ओबीसी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षीरसागर, वि.आ. जिल्हा उपाध्यक्ष ओंकार वायकर,  तेजसकुमार नागवसे, प्रशांत रसाळ, नागेश भादुले, शेरखाने, बालाजी भिसे, आदित्य ढवळे, प्रतीक माळी, दीपक ढवळे, करण गवळी, बाल कीर्तनकार राजश्री ढवळे, सुरेखा वायकर आदींचा  

यथोचित सत्कार आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तर शहरातील सर्व भागामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांचा सेवा सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड. नितीन भोसले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विनोद गपाट, विशाल पाटील, एस.सी मोर्चाचे जिलहाध्यक्ष प्रविण सिरसाठे,  प्रविण पाठक, ओबीसी मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख संतोष क्षिरसागर, दाजीप्पा पवार, सुजीत साळुंके, सुरज शेरकर, संदीप इंगळे, सुनिल पंगुडवाले, वैभव हंचाटे, विलास सांजेकर, अमोल राजे, स्वप्नील नाईकवाडी, श्रीकांत तेरकर, प्रीतम मुंडे, गणेश एडके, सलमान शेख, प्रसाद मुंडे, अजय यादव व भाजपाचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उस्मानाबाद शहरातील सर्व भागामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांचा सेवा सन्मान कार्यक्रम संपन्न झाले.


 
Top