उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दि, 17 मे रोजी जिल्हाधिकारी   कौस्तुभ दिवेगावकर  ,  पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन  , जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, हनुमंत वडगावे यांनी जागजी (ता, उस्मानाबाद) गावाला भेट दिली.

जागजी गावात कोरोनाचा उद्रेक झाला होता, दुसऱ्या लाटेत 110 पेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गावात ग्रामपंचायत प्रशासनाने 7 ते 15 मे कालावधीत कडक जनता करफू लावला, नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने रूग्ण संख्या कमी झाली, गावात कोरोना प्रतिबंधक समिती स्थापन करून व 9 टीम तयार करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले, लक्षणे असलेल्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली, रूग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली.या सर्व कामाचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले,तसेच गावातील पुरातन महालक्ष्मी मंदीराची पाहणी केली.

यावेळी जिल्हा विशेष शाखेत पोलीस निरीक्षक गजानन बाबर, ढोकी पोलीस ठाण्याचे एपीआय अशोक पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ, दिव्या इंगळे, डॉ, निशा रोकडे, सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच वैजिनाथ सावंत, मंडळ अधिकारी भगवान कुलकर्णी, तलाठी श्री, राजेंद्र कासराळे, पोलीस पाटील सुभाष कदम-पाटील, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक बापूराव मेंढेकर, श्री, ढेकणे सर, श्री, बिडवे सर, कोतवाल सोमनाथ गवळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास गवळी, पत्रकार दीपक सावंत, कोरोना प्रतिबंधक समितीचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती आदी उपस्थित होती.

 
Top