उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त नगर परिषद उस्मानाबाद चे अधिकारी व सफाई कर्मचारी यांचा  शहराचे खरे कोरोना योद्धा म्हणून नगरपरिषदचे अधिकारी श्री कांबळे,श्री गोरे साहेब व सफाई कर्मचारी यांचासत्कार करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोना महामारीच्या अनुषंगाने अतिशय साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

 याप्रसंगी युवासेनेचे राज्य विस्ताराक तथा नगरसेवक   सुरज साळुंखे , उपनगराध्यक्ष अभय इंगळे , युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे , नगरसेवक सनी भैया पवार नगरसेवक गणेश असलेकर, संजय दादा पाटील दुधगावकर , गणेश इंगळगी, दत्ता  बंडगर , खंडेराव चौरे , मनोज डोलारे, दत्ता देवकते , हनुमंत देवकते, डा.,संजय सोनटक्के , डाॅ. संजय पाटील ,अशोक सोलनकर , श्रीमंत आप्पा देवकते, बाळू घोगरे, दामू   देवकते , बाळासाहेब देवकते व सुरज महाराज साळुंखे मित्र परिवार उपस्थित होते.

 
Top