उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थित अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अस्मिता कांबळे आणि डॉ. विजयकुमार फड यांनी कुशल प्रशासक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.चालू वर्षी विक्रमी वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय 

तूबाकले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ,पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुसर,कृषी विकास अधिकारी चिमण शेटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मोहरे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता 

शेगर,शाखा अभियंता ओ.के. सय्यद यांची यावेळी उपस्थिती होती.

 
Top