उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

कोरोणाच्या संसर्गजन्य रोगाने मानवाचे जीवन विध्वंसक बनले आहे. जीवन क्षणभंगुर झाल्याची प्रचिती आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांमधून प्रकर्षाने जाणवत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत गरजवंताच्या मदतीसाठी सर्वांनी पुढे यायची गरज आहे असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी व्यक्त केले.उस्मानाबाद जिल्हा परिषदेत महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी कांबळे बोलत होत्या. 

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कर्मचारी कारभारी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले.

 कोरोणा संसर्गजन्य रोगाने मानवी जीवन क्षणभंगुर आहे,याची जाणीव आपणा सर्वांना करून दिलीय. मानवाने एकमेकांच्या प्रती द्वेष,मत्सर भावना न ठेवता आपत्कालीन परिस्थितीत गरजू नागरिकांच्या  मदतीसाठी  जागरूक नागरिक म्हणून मदतीसाठी पुढे येण्याची  गरज आहे.महात्मा बसवेश्वरांनी देखील हाच संदेश समाजाला दिलेला आहे. त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे असे कांबळे यांनी नमूद केले. स्वकष्टाने कमावलेले धन दुसऱ्याच्या कामी यावे, अशा निस्वार्थ भावनेतून समाज सेवा करण्याची संधी कोरोणाच्या महामारी ने उद्भभवली आहे. कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा अवलंब करावा असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.

  महात्मा बसवेश्वर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय 

तुबाकले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आघाव यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील हजारे,भांडार विभाग तथा वरिष्ठ सहाय्यक मधुकर कांबळे यांच्यासह  अधिकारी - कर्मचारी कोरोणा संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते.


 
Top