उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 कोरेानाने शिक्षक दांपत्याचा मृत्यू झाल्यानंतर अनाथ झालेल्या दोन्ही भावंडांना युवा सेनेच्या वतीने दिलासा देण्यात आला. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व वर्गणीतून मिळालेली एकूण १ लाख रुपये रक्कम मुलांकडे सुपूर्द करण्यात आली. शहरातील राम नगर भागातील शिक्षक नितीन चंदनशिवे आणि अस्मिता चंदनशिवे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, कुटंुबातील दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. आठवी आणि बारावीला असलेली ही दोन्ही मुले खचून गेली आहेत.त्यांना धीर देण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी समाजाच्या सहकार्याने १ एक लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.लोकवर्गणीतून ८९ हजार रुपये व अक्षय ढाेबळे यांनी वैयक्तिक ११ हजार रुपये, असे १ लाख रुपये मुलांना दिले.


 
Top