कळंब ( शिवप्रसाद बियाणी

कोरोनामुळे शेवटची घटका जवळ आलेली असताना सुध्दा याला चार हात कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ६० वर्षांच्या शैलजा पाटील यांना कोरोनामुक्त करुन नवीन जिवनदान दिले आहे. 

 कोरोनामु अनेकांना जिव गमवावा लागला आहे. तर अनेकांनी कोरोनाला चार हात करुन जिवनदान मिळवले आहे. असे अनेक कोरोनाला चारीमुंड्या चित करुन पुन्हा नव्या जोमाने आयुष्य जगणाऱ्याच्या संघर्ष गाथा एक प्रकारे कोरोनाला लढण्याची बळ देत आहेत. 

शहरातील सोनार लाईन येथे राहत असणाऱ्या ६० वर्षांच्या शैलजा पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद येथे जाऊन एचआरसीटी तपासणी केली. त्यावेळी स्कोर 21 आला होता. दिनांक 5 मे रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. तीन दिवसात प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तेथील डॉक्टरांनी इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

 अॉक्सिजन लेवल कमी असल्यामुळे रुग्णाला इतर ठिकाणी घेऊन जाणे धोक्याचे होते. अशा बिकट परिस्थिती दिनांक 9 मे रोजी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यावेळी ५५ ते ६० च्या दरम्यान अॉक्सिजन होता. सुध्दा मला काही होणार नाही अशी जगण्याची उमेद शैलजा पाटील यांनी डोळ्यासमोर ठेवली, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना योग्य पध्दतीने उपचार करुन त्या महिलेचा पुर्नरजन्म केले. आहे. 

गंभीर रुग्णाची विशेष काळजी

रुग्णाची प्रकृती गंभीर असताना सुध्दा वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. इम्रान शेख यांनी या गंभीर रुग्णाची विशेष काळजी घेतली व डॉ. मिरा दशरथ, डॉ. गित्ते, डॉ. निलेश भालेराव, डॉ. सुधीर आवटे यांनी सहकार्य केले. 

खासदार, आमदाराने दिला धीर 

विशेष म्हणजे दोन वेळा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे यांनी येऊन आत्या घाबरु नका, मला तुमच्या हाताने बनवलेला चहा प्यायचा आहे, तुम्ही धीर सोडू नका असे सांगून धीर देत होते.


 
Top