उस्मानाबाद / प्रतिनिधी-
भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियल वाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या अमानवी मारहाणीचा भाजपा युवा मोर्चा म्हणून आम्ही निषेध करतो आहोत तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या युवकाला मारहाण करणाऱ्या सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करावे ,अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी केली आहे
भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पैलवान नारियल वाले आपल्या बहिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले असता ना तेथे उपस्थित असणारे पोलीस दर्शन देवावाले या युवकाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे एकत्र झालेल्या जमावातील गवळी समाजाच्या तरुणांना व इतर नातेवाईकांना शिवीगाळ करत होते या अन्यायाला वाचा फोडावी या उद्देशाने नारियल वाले यांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला त्याचा राग मनात धरून उपस्थित सर्व पोलिसांनी मिळून संबंधित युवकाला अमानुष मारहाण केली आहे या अमानवी मारहाणीचा सर्व स्तरातून जाहीर निषेध होत असून या व्हिडिओमध्ये मारहाण करताना दिसणाऱ्या सर्व पोलिसांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा ने केली आहे
भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना मदतीचा खूप मोठा हात दिला व सध्या सुरु ठेवला आहे युवा मोर्चा पदाधिकारी हा कायम संयमी आणि समाजहिताची कामे हाती घेतात परंतु अशा युवकां विरोधात अगदी क्षुल्लक कारणावरून एवढी अमानुष मारहाण होत असेल तर ही प्रशासनासाठी अत्यंत गंभीर बाब आहे या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर मुख्यमंत्री गृहमंत्री जालना पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ कार्यवाही न केल्यास भाजपा युवा मोर्चा आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही असे झाल्यास त्यासाठी सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील ..