उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजन, बेड व आयसीयू ची गरज वाढली असून उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे.तरी जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स व सपोर्टींग स्टाफ तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी  भाजपाच्या वतीने संजय बनसोडे राज्यमंत्री - पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांच्याकडे पत्रद्वारे केली.

पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, सध्या   7608 रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण 44698 रुग्ण रुग्ण कोरोना बाधित झाले असून एकुण 1032 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा दर 2.32% असून मराठवाडयात सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात 60 आयसीयू बेडसाठी केवळ 2 भीषक व 2 भूलतज्ञ आहेत. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर सपोर्टींग स्टाफ फारच कमी आहे. कोरोनाच्या दुसज्या लाटेमध्ये ऑक्सीजन, बेड व आयसीयू ची गरज वाढली असून उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे.

तरी जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वैद्यकीय केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स व सपोर्टींग स्टाफ तातडीने उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे . यावेळी भारतीय जनता युवा मोर्चेचे जिलाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,पाटील, प्रीतम मुंडे , प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी उपस्थित होते,


 
Top