मुरूम / प्रतिनिधी-

 प्रदीर्घ सेवेनंतर प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील सेवानिवृत्त प्रा.राजकुमार त्रिगुळे सोमवारी (ता.३१) रोजी २८ वर्ष पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले. त्यांचा कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य डॉ.अशोक सपाटे व प्राचार्य प्रविण गायकवाड यांच्या हस्ते कै.माधवराव पाटील यांची प्रतिमा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुधीर अंबर, काकासाहेब पाटील, सेवानिवृत्त प्रा.राजेश दलाल, प्रा.शोभा पटवारी, प्रा.कल्याणी टोपगे, प्रा.सुधीर नाकाडे, डॉ.रमाकांत पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.उमाकांत महामुनी, प्रा.शिवाजी राजोळे, प्रा.राजकुमार नाईक, प्रा.नारायण सोलंकर, प्रा.राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा.बबलु अंबर, संजय वैरागकर, राजू कोळी, दत्ता शेळके आदिंनी पुढाकार  घेतला. सत्काराला उत्तर देताना प्रा.राजकुमार त्रिगुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रसायनशास्त्र विभागातील प्रा.शिवाजी राठोड, प्रा.अण्णाराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा.करबसप्पा ब्याळे तर आभार प्रा.सतिश रामपूरे यांनी मानले.              

 
Top