मुरूम / प्रतिनिधी-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट दिवसेंदिवस ग्रामीण भागात वाढतच असल्याने महापुरुषांच्या जयंत्या घरातच साध्या पद्धतीने साजरा करताना सर्वत्र दिसून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करुन अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती देखील सोमवारी (ता.३१) रोजी मुरूम शहर, ता. उमरगा व परिसरात घरा-घरातच साजरी करण्यात आली.

 मुरूम शहर व परिसरात के. डी.शेंडगे रिसर्च सेंटर उमरगाचे संस्थापक डॉ.राजू शेंडगे, डॉ.सचिन शेंडगे, माजी जिल्हा रेशीम अधिकारी प्रभाकर मदने, विजयाताई सोनकाटे, शिक्षकनेते प्रदिप मदने, डॉ.विजय बेडजुर्गे, सहशिक्षक गुंडू दूधभाते, सुधाकर म्हेत्रे, माजी प्राचार्य गोरख घोडके, अँड.अरूण हेडे, प्रा.एस.ई.बिराजदार, प्रा.अशोक दूधभाते, माजी सैनिक खंडू दूधभाते, प्रा.डॉ.राम सोलंकर, चंद्रकांत बनसोडे गुरूजी, सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र गावडे, प्रा.डॉ.सायबण्णा घोडके, प्रा. संतोबा दूधभाते, डॉ.किशोर घोडके, गावडे बुवा, शिवाजी चेंडके, हणमंत शिंदे, विजय घोडके, मुख्याध्यापक कमलाकर मोटे, बालाजी गाडेकर, सुर्यकांत दूधभाते, हिराकांत सोलंकर, सुभाष सोलंकर, प्रा.डॉ.आप्पासाहेब सोनकाटे, आण्णाराव पाटील, देविदास बनसोडे, राहूल माने आदींच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर व परिसरातील बेळंब, भुसणी, सुंदरवाडी, आष्टाकासार, येणेगूर, दस्तापूर, दाळींब, अचलेर, केसरजवळगा, कदेर, कसगी, कसगीवाडी, गुंजोटी आदी गावात या आव्हानाला प्रतिसाद देत साध्या पध्दतीने जयंती साजरी केली. अहिल्यादेवी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शारीरिक अंतर ठेवून अभिवादन करण्यात आले. 

या जयंती प्रसंगी अनेक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचे वाचन लहान बालकांनी केले. आहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकुल काळात एक कुशल राजकारणी, कर्तव्यदक्ष प्रशासक, एक आदर्श स्त्री राज्यकर्त्या म्हणून इतिहासाने त्यांच्या कार्याची दखल आणि नोंद घेतल्याच्या अनेक गोष्टी, जनतेची प्रगती व विकास साधताना सामाजिक भान व शांतता ठेवून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय या मुलभूत मानवी मूल्यांना होळकर यांनी प्रशासन करताना त्याकाळी विशेष प्राधान्य कसे दिले, अशा कितीतरी घटना व प्रसंग इतिहासात नोंदविल्या गेल्याची चर्चा यावेळी बालगोपाळांनी केली. 

 
Top