तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने गरजु पुजा-यांना कीट वाटप करण्याचा निर्णय श्री तुळजाभवानी पाळीकर,पुजारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
श्री तुळजाभवानी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन सांळुके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री तुळजाभवानी मातेच्या गरजु पुजा-यांना त्यांच्या मागणी नुसार जीवनावश्यक वस्तुचे कीट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.तरी गरजु पुजा-यांनी लिखीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच लसीकरण करण्यासाठी मंडळाचा हाँल व सुविधा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष विपीन शिंदे, किरण क्षिरसागर, नागेश सांळुके, प्रा. धनंजय लोंढे ,शांताराम पेंदे ,लालासाहेब मगर, अविनाश गंगणे ,अजित क्षिरसागर, नरेश अमृतराव, सुधीर रोचकरी, योगेश रोचकरी, शिवाजी बोधले, कल्याण भोसले,सचिन कदम, विकास खपले, सुदर्शन झाडपीडे, सुजय हंगरगेकर, भारत कदम, संभाजी भांजी आदी उपस्थितीत होते.