परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषद सर्व नगरसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, यासाठी आज मा. नगराध्यक्ष आणि मा. मुख्याधिकारी यांना लेखी पत्र दिले. परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आज जनशक्ती नगर विकास आघाडी च्या सर्व नगरसेवक यांनी पुतळा उभारण्याची मागणी करत तात्काळ नगरपरिषद ची विशेष सभा घ्यावी अशी मागणी केली.     यावेळी जनशक्ती नगर विकास आघाडी उपनगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top