तेर / प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार लोकसहभागातून चालू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना येथील खाजगी वैद्यकीय अधिकारी मोफत सेवा देत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार लोकसहभागतून तेर येथे सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना डॉ. के.बी .बाहेती, डॉ. तानाजी काटे, डॉ. बालाजी खराडे, डॉ. सुनील शेंडगे, डॉ. मयूर मुळे, डॉ. श्रीकांत लोमटे, डॉ. दीपक ढाकणे हे रूग्नाची मोफत वैद्यकीय तपासणी करीत आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही 17 मे ला तेर येतील कोरूना विलीनीकरण कक्षास भेट दिल्यानंतर रुग्णाला मोफत सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी यांचे कौतुक केले होते.

 

 
Top