तेर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे प्रत्येक घरोघरी नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याचा प्रारंभ 23 एप्रिल पासून करण्यात आला आहे.
कोरोना रूग्नाची संख्या दिवसेंनदिवस वाढत असल्याने “माझे गाव कोरोना मुक्त गाव”ग्राम सुरक्षा समितीची बैठक तेर ग्रामपंचायतमध्ये 22 एप्रिलला घेऊन उस्मानाबाद तालुक्यातील तेर ग्रामपंचायतने तेर मधील प्रत्येक घरोघरी जाऊन ताप तपासणी व आॅक्सीजन लेवल मशिन व्दारे तपासणी करण्याचा निर्णय घेतला .ही तपासणी तेर मधील सहाही वाॅडात होणार असून यासाठी प्रत्येक वाॅडात शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस,आशा स्वंयसेविका यांची पथकामध्ये निवड करण्यात आली आहे.प्रत्येक पथकाला त्या त्या वाॅडातील ग्रामपंचायत सदस्य सहकार्य करणार आहेत . तपासणीत कोरोना संशयीत रूग्न आढळला तर रूग्नाची तेर येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अॅटिंजन टेस्ट करण्यात येणार आहे.त्यामुळे कोरोना रूग्नाची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. तेरमध्ये 23 एप्रिल पासून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी ,उपसरपच मज्जित मनियार यांनी दिली.