तेर / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी जुनेद मोमीन यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ नागनंदा मगरे यांच्या हस्ते जुनेद मोमीन यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ .विजय विश्वकर्मा , इर्शाद मुलांनी , हरी खोटे , सुभाष कुलकर्णी उपस्थित होते.