उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील महाळगी येथील तानाजी तांबे यांच्या कोविड 19 रिपोर्ट पाँजिप्टिव आल्याने त्यांना काही लक्षणे होती त्या मुळे त्यांना उस्मानाबाद शहरातील TPS शाळेत कोरन्टाईन करण्यात आले होते. त्रास वाढल्याने व स्कोर कमी झाल्याने नातेवाईकांनी उस्मानाबाद शहरात लक्ष्मी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले त्यावेळी तानाजी तांबे यांच्या स्कोर 29 होता. अशी माहिती डॉ आरुण मोरे यांनी दिली व पाच दिवस उपचारानंतर त्यांची परिस्थिती नॉर्मल झाली व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
तानाजी तांबे यांचे भाऊ बालाजी तांबे व आखील भारतीय जिवा सेना व सकल नाभिक समाज यांच्या वतीने लक्ष्मी हास्पिटलचे डॉ आरुण मोरे , डॉ शफिक मुजावर , डॉ शरद पाडुळे यांचा शाल , फेटा , श्रीफळ देऊन ( शुक्रवारी दि 23 रोजी ) सत्कार केला यावेळी बालाजी तांबे यांनी डॉक्टरांच्या पाया पडत ‘ तुम्ही माझ्यासाठी देव आहात’ माझ्या भावाचे तुम्ही प्राण वाचविले असे उच्चार काढत डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी हॉस्पिटल मधील कर्मचारी यांचा देखील फुल देऊन सत्कार केला यावेळी आखील भारतीय जिवा सेनाचे जिल्हा अध्यक्ष नामदेव वाघमारे , जिल्हा प्रवक्ते रविंद्र राऊत यांनी रुग्णालयातील कर्मचारी ऋषिकेश पवार , अभिजीत भोसले , नादुकनवरे भाग्यश्री , सरस्वती खिल्लारे , श्रीकांत स्वामी , वैष्णवी अपरगे , बंगाळे आदित्य , सरस्वती केंद्रे , शेख , स्वाती गायकवाड , अमोल अंकुशराव , प्राजक्ता फुटाणे , पूजा बस्के , रोहित मसे , अक्षय घुमटे यांच्या फुले देऊन सत्कार केला .